कवी : नारायण हरी पालकर
काव्यसंग्रह : दुमदुमवू त्रिभवने
बिभ्वय जव उलटे फासा
बुडे धर्म, संस्कृती, स्वभाषा
दिसे जीवनी कुणा न आशा
फुलवायला पुन्हा सत्याचा अंगार ।
उचलतो म्हणून बेलभांडार ।।
शिव्छत्रपतींनी रायरेश्वराच्या चरणी प्रार्थना करून शपथ घेतली. ती शपथ का घेतली?? याचे वर्णन कवीने येथे केले आहे. हि कविता म्हणजे एक प्रेरणा व वीरस्य प्रधान काव्य आहे. जेणे करून युवकांमध्ये देशप्रेम जागेल. ज्यावेळेस परकीय सत्तांचा देशाल अंमल होता. उत्तरेत मोगल, दक्षिणेत आदिलशाह, निजामशहा, कुतुबशहा, या राजवटींनी महाराष्ट्र काबीज केला होता. या राजवटींनी धार्मिक अराजकता निर्माण केली. महाराष्ट्रात दुष्काळ पडला. लोकांना जगण्याची आशाच उरली नव्हती. धर्म, संकृती, भाषा यांच्या संरक्षणासाठी आणि लोकांमध्ये सत्याचा, स्वातंत्र्याचा, अस्मितेचा अंगार फुलवायला व मराठी माणसात स्वराज्याबद्दल प्रेम व स्वराज्य स्थापण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात बेल भंडारा उचलून शपथ घेतली होती.
टाकीन भंगून रिपु सिंहासन
धुली-मलिन ध्वज उंच उभारीन
हिंदू यशाचा डंका घुमविन
काय कमी रायरेश्वरा तव असल्यावर आधार।
उचलतो म्हणून बेलभांडार।।
शिवराय म्हणतात टाकून भांडून रिपु सिंहासन शत्रूचा निष्पत करून मलिन झालेला भगवा ध्वज उंच फडकवेन. संपूर्ण देशाला स्वतंत्र करेन. अखंड विश्वात हिंदू यशाचा डंका घुमविन, पुन्हा रामराज्य निर्माण करण्याचा अट्टाहास शिवरायांमध्ये दिसून येतो. पुढे राजे म्हणतात जो पर्यंत शिवशंकरा, रायरेश्वरा तुझा आधार मिळाल्यावर तर अखंड हिंदुस्थानात पुन्हा हिंदूंचे राज्य निर्माण करीन हेच ध्येय मला पूर्ण करायचे असून तुझा आधार असल्यावर तर अखंड हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण होईल आणि ते निर्माण केल्याशिवाय मी स्वस्थ बसू शकत नाही. आणि म्हणूनच मी बेलभांडार उचलून तुझी शप्पथ घेतो आणि ध्येय गाठण्याचा प्रयत्न करून स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार करतो.
या कवितेत कवीच्या कल्पनशक्तित व सृजनशक्तीचा साक्षात्कार होतोय़ कवितेतून कवीने रायरेश्वराच्या मंदिरातील प्रसंग उभेउभ साकारला आहे. यावरून आपणास कवीच्या देशप्रेमाचा देखील दिसते. कवीच्या अशा कवीतेमुळेच युवकांमध्ये देशप्रेम जगण्याचा व देशाबद्दलच्या अस्मितेची धग पेरव्न्यचे अहम् कार्य घडून येते.खरेतर सावरकर, सेनापती बापट, कवी गोविंद यांच्या कवितांच्या रांगेत नाना बसले. देशप्रेमाच्या कविता स्फुरण्यासाठी जाज्वल्य देशभक्ती असणे आवश्यक आहे.
एकविसाव्या शतकात देखील भारतीय माणूस आपल्यदेशल भूमीला भारतमाता म्हणून संबोधते. त्याच्यासाठी मातृभूमी हीच मत जननी आहे. आपल्या आईसाठी मातृभुमिसाठीच त्याने जीवन अर्पण असते. कवीने देशप्रेमाने भारावून त्या कवितेची निर्मिती केल्याचे दिसून येते. या कवितेतून कवी शूरवीर अशा बाल शिवाजीच्या निर्धाराची जाणीव करून देतो यावरून कवीच्या सद्सद्विवेक बुद्धीची मात्र दिसून येते. कवीने छत्रपति शिवाजी महाराजांच्या कार्याची सुरुवात इतक्या कुशलतेने मांडली कि आपण कवितेच्या ओळी म्हणताना त्या काळात असल्याचा भास होतो. हि कविता आस्वाद घेण्यासाठी नसून, कर्णमधुर नसून जाज्वल्य देशप्रेम जगवण्यासाठीची आहे. काम, क्रोध, लोभ, मत्सर यापेक्षा हि स्वार्थ बुद्धीत ठेवता देशासाठी जगण्याची प्रेरणा देते.
No comments:
Post a Comment