Thursday, February 13, 2014

कवी : नारायण हरी पालकर

कवी : नारायण हरी पालकर

काव्यसंग्रह : दुमदुमवू त्रिभवने

बिभ्वय जव उलटे फासा
बुडे धर्म, संस्कृती, स्वभाषा
दिसे जीवनी कुणा न आशा
फुलवायला पुन्हा  सत्याचा अंगार ।
उचलतो म्हणून बेलभांडार ।।

          शिव्छत्रपतींनी रायरेश्वराच्या चरणी प्रार्थना करून शपथ घेतली. ती शपथ का घेतली?? याचे वर्णन कवीने येथे केले आहे.  हि कविता म्हणजे एक प्रेरणा व वीरस्य प्रधान काव्य आहे. जेणे करून युवकांमध्ये देशप्रेम जागेल. ज्यावेळेस परकीय सत्तांचा देशाल अंमल होता. उत्तरेत मोगल, दक्षिणेत आदिलशाह, निजामशहा, कुतुबशहा, या राजवटींनी महाराष्ट्र काबीज केला होता. या राजवटींनी धार्मिक अराजकता निर्माण केली. महाराष्ट्रात दुष्काळ पडला. लोकांना जगण्याची आशाच उरली नव्हती. धर्म, संकृती, भाषा यांच्या संरक्षणासाठी आणि लोकांमध्ये सत्याचा, स्वातंत्र्याचा, अस्मितेचा अंगार फुलवायला व मराठी माणसात स्वराज्याबद्दल प्रेम व स्वराज्य स्थापण्यासाठी रायरेश्वराच्या मंदिरात बेल  भंडारा उचलून शपथ घेतली होती.


टाकीन भंगून रिपु सिंहासन
धुली-मलिन ध्वज उंच उभारीन
हिंदू यशाचा डंका घुमविन
काय कमी रायरेश्वरा तव असल्यावर आधार।
उचलतो म्हणून बेलभांडार।।

          शिवराय म्हणतात टाकून भांडून रिपु सिंहासन शत्रूचा निष्पत करून मलिन झालेला भगवा ध्वज उंच फडकवेन. संपूर्ण देशाला स्वतंत्र करेन. अखंड विश्वात हिंदू यशाचा डंका घुमविन, पुन्हा रामराज्य निर्माण करण्याचा अट्टाहास शिवरायांमध्ये दिसून येतो. पुढे राजे म्हणतात जो पर्यंत शिवशंकरा, रायरेश्वरा तुझा आधार मिळाल्यावर तर अखंड हिंदुस्थानात पुन्हा हिंदूंचे राज्य निर्माण करीन हेच ध्येय मला पूर्ण करायचे असून तुझा आधार असल्यावर तर अखंड हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण होईल आणि ते निर्माण केल्याशिवाय मी स्वस्थ बसू शकत नाही. आणि म्हणूनच मी बेलभांडार उचलून तुझी शप्पथ घेतो आणि ध्येय गाठण्याचा प्रयत्न करून स्वराज्य निर्माण करण्याचा निर्धार करतो.
         या कवितेत कवीच्या कल्पनशक्तित व  सृजनशक्तीचा साक्षात्कार होतोय़ कवितेतून कवीने रायरेश्वराच्या मंदिरातील प्रसंग उभेउभ साकारला आहे. यावरून आपणास कवीच्या देशप्रेमाचा देखील दिसते. कवीच्या अशा कवीतेमुळेच युवकांमध्ये देशप्रेम जगण्याचा व देशाबद्दलच्या अस्मितेची धग पेरव्न्यचे अहम् कार्य घडून येते.खरेतर सावरकर, सेनापती बापट, कवी गोविंद यांच्या कवितांच्या रांगेत नाना बसले. देशप्रेमाच्या कविता स्फुरण्यासाठी जाज्वल्य देशभक्ती असणे आवश्यक आहे.
          एकविसाव्या शतकात देखील भारतीय माणूस आपल्यदेशल भूमीला भारतमाता म्हणून संबोधते. त्याच्यासाठी मातृभूमी हीच मत जननी आहे. आपल्या आईसाठी मातृभुमिसाठीच त्याने जीवन अर्पण असते. कवीने देशप्रेमाने भारावून त्या कवितेची निर्मिती केल्याचे दिसून येते. या कवितेतून कवी शूरवीर अशा बाल शिवाजीच्या निर्धाराची जाणीव करून देतो यावरून कवीच्या सद्सद्विवेक बुद्धीची मात्र दिसून येते. कवीने छत्रपति शिवाजी महाराजांच्या कार्याची सुरुवात इतक्या कुशलतेने मांडली कि आपण कवितेच्या ओळी म्हणताना त्या काळात असल्याचा भास होतो. हि कविता आस्वाद घेण्यासाठी नसून, कर्णमधुर नसून जाज्वल्य देशप्रेम जगवण्यासाठीची आहे. काम, क्रोध, लोभ, मत्सर यापेक्षा हि स्वार्थ बुद्धीत ठेवता देशासाठी जगण्याची प्रेरणा देते. 

Monday, February 10, 2014

विंदा करंदीकर (शलाका)

कवी विंदा करंदीकर
कवितेचे नाव : शलाका

सत्य युगांतर -
                       सत्ययुगाच्या अखेर झाली
                       'प्रेम' द्वेष यांच्यात लढाई
                       द्वेष जाहला विजयी आणिक
                       वर्ष प्रेम आइच्या हृदयी

     खरे तर कलयुगात प्रेम हि संकल्पना फक्त स्वार्थी राहिली आहे. कारण जनमानसात फक्त स्वार्थ साधण्यासाठी प्रेमळ वागणारी लोक असतात परंतु देवानंतरची व्यक्ती आई आहे.आईचे प्रेम हे जगातील सर्वात अनमोल असते. म्हणूनच कवीला हि चारोळी सुचली असावी. जगाच्या इतिहासात हिंदू धर्म परंपरेनुसार चार युग आहेत. सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग, कलयुग, -- सतयुगाच्या अखेरीत मनुष्य मात्र या पृथ्वीवर राहिले आहेत. आणि त्यात प्रेम आणि द्वेष यांच्यात लढाई  झाली. खरे तर माणसामाणसात भेद निर्माण झाला. आपापसातले प्रेम नाहीसे झाले  आहे. आणि द्वेषाला या जगात स्थान  मिळाले आहे. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत.त्याची साक्ष महायुद्धे देतात. एवढा द्वेष माणसाच्या आतल्या द्वेषामुळे निर्माण झाला. आणि प्रेम फक्त आई च्या हृदयात लपले. आई म्हणजे जगत जननी होय. कवीच्या चार ओळीत आई आणि प्रेम यांचा अर्थ कळतो. आई आणि प्रेम अशा गोष्टी आहेत ज्या जवळ असल्यावर त्यांची किंमत कळत नाही तर त्या लांब गेल्यावर कळते आणि डोळे अश्रुनी डबडबतात.

सारांश :           रामायण वाचुनिया नंतर
                       बोध कोणता घ्यावा आपण?
                       श्रीरामास मिलता नायक
                       वानरसुद्धा मारिती रावण

    रामायण वाचल्यानंतर पुरुशार्याची खरी व्याख्या काय हे कवीला दाखवायचे आहे. आज जगात अनेक नायक झालेत पण सगळेच महान होऊ शकले नाहीत. नेता जसा तसे लोक. नेत्याची, राजाची ओळख करून दिली " नेता कसा असावा " याचे उत्तम उदाहरण म्हणजेच प्रभू श्रीराम. होय, असा नेता जेव्हा मिळतो तेव्हा सामान्य माणूस देखील मोठमोठ्या शत्रूला हरवू शकतात. याचे अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपति शिवराय. शिवरायांसारखा नेता मिळाल्यामुळे या हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण झाले. दऱ्या खोऱ्यातील मावळ्यांचा मनात प्रचंड देशप्रेम जागवून शिवरायांनी स्वराज्याची स्थापना  केली. नेतृत्व क्षमता ज्या व्यक्तीत असते तो समाजात नेता म्हणून मार्गदर्शन करतो व असामान्य  लोकांकडून करून घेतो. त्यामुळे नायक श्रीरामासारखा असणे अपेक्षित आहे.


इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पहस्थल त्याचे आणिक
चढुनी त्यावर भविष्य वाचा

इतिहासातून मानवाने बोध घेणे महत्वाचे असते. त्यातून जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन मिळत असते. परंतु मानव प्राणी इतिहासाला कवटाळून बसतो आपल्या पूर्व इतिहासाला कोसत बसतो. त्यातल्या चुका रटाळपद्धतीने घडोघडी चघळत असतो. त्यामुळे त्याचा भ्रमनिरास होऊन दुख्खाचा भोगी होतो आणि आपल्या भविष्याला अंधारात ठेवतो. त्यामुळे त्याच्या जीवनाची दिशाभूल होते.
                  खरेतर इतिहास म्हणजे जीवनात आपल्याकडून त्याच चुका पुन्हा होऊ नयेत आणि वर्तमानात त्यावर विचार करून व्यवस्थित व धीरोदात्तपणे योग्य पूल उचलल्यास उज्ज्वल भविष्य घडू शकते. त्यामुळे कवीने या चार ओळीच्या कवितेत खर्या अर्थाने जगण्याची वाट कशी निर्माण करावी हे शिकवले. त्यामुळेच या चार ओळीत जगण्याची ताकद मिळून देणारे शब्द दडलेत., या ओव्यांमद्धे कवीने इतिहासाचा अर्थ व्यापून टाकला आहे.

Friday, February 7, 2014

वसंत बापट (केवळ माझा सह्यकडा)

कवी वसंत बापट
वसंत बापटांचा जन्म २५ जुलै, इ.स. १९२२ रोजी महाराष्ट्रात कऱ्हाड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर 'नॅशनल कॉलेज आणि रामनारायण रूईया कॉलेज' हया महाविद्यायलयांतून मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक होते. इ.स. १९७४ पासून मुंबई विद्यापीठातील गुरूदेव रवींद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते.


वसंत बापट भारताच्या स्वांतत्र्यलढ्यातही सहभागी झाले होते. इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत ते सहभागी होते. ऑगस्ट, इ.स. १९४३ ते जानेवारी, इ.स. १९४५ पर्यंत ते तुरूगांत होते. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ ते पर्यंत ते मुंबई विद्यापीठात ते प्राध्यापक होते. इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ ते साधना नियतकालिकाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते.

इ.स. १९७२ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. लहानपणापासून वसंत बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. 'बिजली' हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा' , 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते.

कवितेचे नाव : केवळ माझा सह्यकडा


 भव्य हिमालय तुमचाआमचा
केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा
मानत पूजीन रायगड़ा

           या कवितेतून कविचे महाराष्ट्राबद्दलचे प्रेम दिसून येते. खरया अर्थाने महाराष्ट्रात जेजे सुंदर आणि भव्य आहे ते ते सर्व भारतीयांचे आहे. परन्तु भारताचे उदात्त व सुंदर व भव्य आहे. त्याला कवी सर्वांचे असल्याचे मानतो. परंतु कवी आपल्या मायबोलीचा , मराठी संस्कृतीचा अभिमान विसरु शकत नाही. त्यामुळे कवी या कवितेत महाराष्ट्रातील भव्य दिव्य गोष्टींवर आपला हक्क मानतो व कवितेत देखील मांडतो. कवीच्या या कवितेतील ओळी मराठी माणसाच्या मनाला भिडतात. म्हणून देशप्रेम तर आहेच परंतु महाराष्ट्राबद्दलचे प्रेम तो आवर्जून मांडतो. 

तुमच्या अमुच्या  गंगा-यमुना
केवळ माझी भिवर थडी
प्यार मला हे कभिन्न कातळ
प्यारी मला हि छाती निधडी

भारतात गंगा यमुना या नद्यांचे स्थान माते प्रमाणे आहे. कवीला खऱ्या अर्थाने भारताबद्दल प्रेम आकर्षण आहेत तेथे तो नाकारत नाहीऽत कवीला महाराष्ट्रातील भीमेचा काठ अधिक जवळचा वाटतो म्हणूनच कि काय कवी भिवर थडी चा आधारच त्याला मोठा वाटतो. कविला या अभिन कतलिवर प्रेम असल्याचे तो या कवितेत मांडतो. खर्या अर्थाने मराठी मनसे निधड्या छातीची आहेत असं त्याला म्हणायचे आहे.

मधु गुंजन लाखलाभ तुम्हाला,
बोल रंगला प्यार मला
ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते
तुक्याचा आधार मला

या चार ओळीच कवीने जणू संपूर्ण जगाचे तत्वज्ञानच मांडून ठेवलेलं दिसून येत. परंतु बुद्ध, ख्रिस्त यांचे विश्वशांतीचे प्रतिक त्याला भावते. त्यापेक्षा त्याला संत तुकारामांचे अभंग मनाच्या जवळचे वाटतात. त्याला ते धर्माचे आधार वाटतात. खर्या अर्थाने तुकाराम महाराजांनी अभंगातून समाजसुधारणेचा तहात मांडला होता. कवीला संत तुअकरमनचे समाज प्रबोधन भावते. खऱ्या अर्थाने केवळ माझा सह्यकडा हे शाहिरी गीत महाराष्ट्राविषयी अभिमान जागवण्याचे काम करतात.

धिक तुमचे स्वर्गही साती
इथली चुम्बीन मी माती
या मातीचे कण लोहाचे
तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातून अजूनी
वाहतसे लावा सगळा

लोक स्वर्गाचे गुणगान करत असतात।पन कवीला आपल्या मातीचे चुंबन करण्यास आवडते. कवीला महाराष्ट्राची माती त्याच्या प्राणाहूनही प्रिय वाटतेक़वि म्हणतो या मातीच्या कणाकणात शौर्य सामावलेले आहे. आणि या मातीतील लोकांच्या हृदयात देशप्रेमाचा लाव्हा वाहतो. खरेतर महाराष्ट्राच्या मातीत वीर स्वर्च्य धारा वाहतात. त्यामुळेच तर जाज्वल्य देशप्रेमाचे अभिदर्शन या कवितेतून कवी मांडतो. आणि यातूनच युवकांना देशप्रेमाचे दर्शन होत असते.